नाशिकच्या पुणे रोडवरील शिवाजीनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकी आणि पिकअप वाहनाचा अपघात झाला. रात्री सुमारे दोन वाजता हा अपघात घडल्याची माहिती आहे.
पियुष आणि अनुराग हे दोघे बुलेटवरून घरी जात असताना भडगाव पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. धडकेनंतर पिकअप चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला.
अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, अपघातानंतर वाहनासह फरार झालेल्या पिकअप चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. अपघात नेमका कसा घडला आणि यामध्ये कोणाची चूक होती, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.


