धाराशिव : पाण्याअभावी पिके वाळू लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील शेतकरी नाना सुरडे यांनी साडेसात लाख रुपये खर्चून लागवड केलेल्या पाच एकरांवरील सिमला मिरचीच्या पिकावर अखेर रोटावेटर फिरवला.
पावसाने दडी मारल्याने आणि विहीर व बोअरवेलमधील पाणीसाठे आटल्याने पीक वाळू लागले. पीक वाचवण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर सुरडे यांनी हा निर्णय घेतला. या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने सरकारकडे भरीव आर्थिक मदतीची मागणी केली आहे.


