मुंबई : अभिनेता इम्रान खानच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता उपलब्ध नसल्याने या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सुनावणी पुढे गेल्याने इम्रान खानला अंतरिम दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देश सोडण्यासंदर्भातील नोटीसच्या मुद्द्यावर हे प्रकरण चर्चेत असून, पुढील सुनावणीपर्यंत त्याला दिलासा मिळतो का, याकडे लक्ष लागले आहे.


