महायुतीने एकत्रितपणे आणि समन्वयाने निवडणूक लढवली असती, तर पाचही जागांवर विजय मिळवता आला असता, असं भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. आपापसातील समन्वयाच्या अभावामुळे महायुतीला अपेक्षित यश मिळवता आलं नाही, असं मत व्यक्त करत त्यांनी यावर विचार करण्याची गरज असल्याचं सांगितलं. पुण्यात खुलेपणाने मतदान करण्यास सांगण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना मांडल्या. भाजपचा पूर्वी एकही उमेदवार नसलेल्या ठिकाणी पक्षाचा उमेदवार विजयी झाल्याचं सांगतानाच काँग्रेसचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर असल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी केशव उपाध्ये यांनी INDIA आघाडीवर टीका करत विरोधकांना तरुणांच्या प्रश्नांपेक्षा मतांचं राजकारण महत्त्वाचं असल्याचा आरोप केला.