गुरुपौर्णिमेनिमित्त देश-विदेशातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांवर भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी प्रधान केंद्र आणि त्र्यंबकेश्वर गुरुपीठ येथे मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
दिंडोरी प्रधान केंद्रात गुरुपौर्णिमेच्या दिवशी दीड लाखांहून अधिक भाविकांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांनी सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच हजारो सेवेकऱ्यांशी वैयक्तिक संवाद साधत त्यांना आशीर्वाद दिले.
त्र्यंबकेश्वर गुरुपीठातही दिवसभर दर्शन, पूजा-अर्चा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भक्तांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
भारतासह अमेरिका, कॅनडा, इंग्लंड आणि इतर देशांतील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांवरही गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सेवाकार्याचा विस्तार, सामाजिक उपक्रम आणि भविष्यातील नियोजनाबाबत गुरुमाऊलींनी सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले.


