छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजीत दिपकेंच्या कार्यपद्धतीविरोधात दोन तरुणांनी अन्नपाणी त्याग उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, दिपकेंच्या निर्णयप्रक्रियेवर आंदोलनकर्त्यांनी सवाल उपस्थित केले आहेत.
अहमदाबादमधील मनीष ब्रह्मभट आणि राहुल पांड्या या दोन तरुणांनी हे उपोषण सुरू केले आहे. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, निर्णयप्रक्रियेत तरुण आणि संबंधित व्हॉलेंटिअर्सना सहभागी करून घेण्याऐवजी निवडक लोकांची टीम तयार करण्यात आली आहे. दिपके मनमानी पद्धतीने निर्णय घेत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
या आंदोलनादरम्यान तरुणांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच व्हॉलेंटिअर्सना योग्य भूमिका देण्यात यावी, अशीही भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे.
उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच असून, मनीष ब्रह्मभट आणि राहुल पांड्या यांनी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी ‘देशात दुसरा केजरीवाल होऊ देणार नाही’, असा इशारा दिला.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी केलेले आरोप हे त्यांचे दावे असून, याबाबत अभिजीत दिपके यांची भूमिका समोर आलेली नाही. त्यांच्या भूमिकेनंतर या प्रकरणाचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.


