नाशिकमध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण हालचालींना वेग आला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित आरक्षणाच्या मागण्यांसंदर्भात पुढील भूमिका ठरवण्यासाठी कालिका माता मंदिराच्या सभागृहात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत मराठा आरक्षणाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार असून, समाजाची पुढील दिशा, आंदोलनाची भूमिका आणि भविष्यातील निर्णय याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा अपेक्षित आहे. या बैठकीत होणाऱ्या निर्णयांकडे मराठा समाजासह संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढे कोणती भूमिका घेतली जाणार? बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय होणार? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आपलं नाशिक | आपला आवाज.