आज श्रावणातील पहिला सोमवार असल्याने पंचवटीतील श्री कपालेश्वर महादेव मंदिरात पहाटेपासूनच भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे.
गोदावरीच्या तीरावर वसलेल्या या मंदिरात पहाटेच्या पूजेसह अभिषेक आणि विधिवत आरती करण्यात आली.
शिवभक्तीच्या जागरासाठी सकाळपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.
श्रावणातील पहिल्या सोमवारी भगवान शंकराच्या दर्शनासाठी नाशिकसह परिसरातून भाविक दाखल झाले आहेत.
मंदिर परिसरात पूजा, अभिषेक आणि आरतीमुळे भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, तब्बल ५० वर्षांनंतर श्रावणात दोन पौर्णिमा आणि दोन अमावस्यांचा पर्वणी योग आल्याने यंदाचा श्रावण विशेष ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर कपालेश्वर महादेव मंदिरात श्रावणातील धार्मिक उत्साह अधिक वाढला आहे.
पहाटेपासून सुरू असलेल्या धार्मिक विधींमुळे पंचवटी परिसरात हर हर महादेवच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले आहे.
ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग
श्रावणातील पहिल्या सोमवारी कपालेश्वर मंदिरात भक्तिमय वातावरण
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
ब्रेकिंग न्यूज
सिंहस्थ कुंभमेळ्यात शैव-वैष्णव आखाड्यांचे मनोमिलन होणार; गिरीश महाजनांची माहिती
ब्रेकिंग न्यूज
महसूल अधिकाऱ्यांचे दालन रोज दोन तास जनतेसाठी खुले; दुपारी ३ ते ५ जनता दरबार
ब्रेकिंग न्यूज
अमृत मिरवणूक मार्गावरील भूमिगत कामांना आठ दिवसांची मुदत; मुदतीनंतर रस्ते खोदाई बंद
ब्रेकिंग न्यूज
आडगावच्या टेकड्या मुरूम माफियांच्या घशात! | Apla Nashik
ब्रेकिंग न्यूज
कोठुरे फाट्यावर भीषण अपघात! भरधाव कार पलटी; चालकासह काही जण जखमी


