इगतपुरीत एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
वनजमिनीचे पट्टे, रेशनकार्ड आणि आदिवासी भागातील प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी आंदोलनाची भूमिका घेतली.
आंदोलकांनी मुंबई-नाशिक आणि नाशिक-मुंबई महामार्गावर ठिय्या मांडल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली.
वनजमिनीच्या हक्कांसह रेशनकार्ड आणि इतर प्रलंबित मागण्यांवरून आंदोलक आक्रमक झाले.
आंदोलनस्थळी तहसीलदार आणि आंदोलकांमध्ये मागण्यांवरून शाब्दिक चकमक झाल्याचेही पाहायला मिळाले.
या प्रकारामुळे काही काळ महामार्ग परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
प्रशासनाने प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे.