लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. एन. डी. पटेल रोडवरील अण्णाभाऊ साठे यांच्या ११ फूट उंच भव्य पुतळ्याचे लोकार्पण मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन आणि आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला नागरिक, कार्यकर्ते, साहित्यप्रेमी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकार्पणानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.

यानंतर कालिदास कला मंदिर येथे आयोजित सत्कार सोहळ्यात समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी सामाजिक समता, बंधुता आणि सर्वसमावेशक समाज घडविण्याचा संदेश पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.