नाशिकमध्ये येत्या २४ ऑक्टोबरला महाविकास आघाडीकडून सरकारविरोधात महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात बाळासाहेब थोरात सहभागी होणार असून, आदित्य ठाकरे नाशिकमध्ये येणार आहेत. रोहित पवार मोर्चाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती आहे.
मोर्चाच्या नियोजनासाठी काँग्रेस भवनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. जनतेच्या प्रश्नांवरून सरकारला घेरण्याची रणनीती या बैठकीत आखण्यात आली.


