मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत त्यांच्या स्वीय सहायकासह अकाउंटंटलाही ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
कंत्राटदाराच्या बिलाच्या मंजुरीसाठी चार टक्के लाचेची मागणी केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. अधीक्षक भारत तांगडे यांच्या नेतृत्वाखाली मालेगावमध्ये एसीबीने सापळा रचल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


