राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फेरविचार याचिकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावरील फेरविचार याचिकेचा निर्णय सहा महिन्यांच्या आत घ्यावा, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.
सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी प्रकरणातील विलंबाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. यासोबतच राज्य सरकारने अद्याप या प्रकरणात आपली भूमिका मांडलेली नसल्याचाही दावा करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर आता मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या फेरविचार याचिकेवरील पुढील सुनावणी आणि अंतिम निर्णयाकडे राजकीय तसेच कायदेविषयक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


