नाशिकच्या मुंबई महामार्गावर रायगडनगरजवळ रात्री भीषण अपघात झाला. रस्ता ओलांडणाऱ्या तीन महिलांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. जखमी महिलांना नरेंद्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अज्ञात वाहनचालकाचा शोध पोलीस घेत आहेत.


