नाशिकच्या नवीन बिटको रुग्णालयातील सर्जनच्या अभावामुळे रुग्णांच्या उपचारांचा प्रश्न निर्माण झाला आहे. एका सर्जनने राजीनामा दिला, तर दुसऱ्या सर्जनचा कार्यकाळ संपल्याने शस्त्रक्रियांवर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. उपचारांसाठी रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत असून, काहींना खासगी रुग्णालयात जाण्याची वेळ येत आहे.
रिक्त पदे तातडीने भरून रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता मनपा प्रशासन याकडे कधी लक्ष देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


