नाशिक शहर पोलिस दलात प्रशासकीय स्तरावर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले असून, चार पोलिस निरीक्षकांना विविध पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखांमध्ये नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

या फेरबदलानुसार पोलिस निरीक्षक युवराज पत्की यांची सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्याकडे गंगापूर पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

याशिवाय पोलिस निरीक्षक अशोक शर्माळे यांची वाहतूक शाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक संजय पिसे यांच्याकडे सातपूर वाहतूक शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

प्रशासकीय कामकाज अधिक परिणामकारक आणि कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने हे फेरबदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. नव्या नियुक्तीनंतर संबंधित अधिकारी आपल्या-आपल्या कार्यक्षेत्राचा पदभार स्वीकारून कामकाज सुरू करणार आहेत.