नाशिकच्या सातपूर परिसरात स्कूल व्हॅन चालक मोहन वाघ यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोरांपासून बचाव करण्यासाठी मोहन वाघ यांनी घरात धाव घेतली. यावेळी घराबाहेर उभ्या असलेल्या दोन वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.

रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी घडलेल्या या घटनेप्रकरणी सातपूर पोलिसांत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य संशयित देवा बोडके आणि ओम लहांगे पोलिसांच्या ताब्यात आहेत.