नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने यंदा २५ टक्के अधिक पाण्याची मागणी केली आहे. साधू-महंत आणि भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन एकूण आठ हजार पाच दशलक्ष घनफूट पाण्याचे नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गंगापूर धरणातून सर्वाधिक पाणी मागण्यात आले असून, मुकणे आणि दारणा धरणांतूनही पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. साधुग्रामसाठी दररोज १४० एमएलडी पाण्याची आवश्यकता अपेक्षित आहे. पाणीकपातीबाबतची अनिश्चितता कायम असून, जलसंपदा विभाग आणि पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होणार आहे.


