नाशिकच्या पंचवटी परिसरात उपचाराच्या बहाण्याने आदिवासी महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विक्रम साह आणि अशोक साह यांच्याविरोधात म्हसरूळ पोलिसांत ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप असून, दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे.