पेठ-नाशिक महामार्गावर पिकअप आणि दुचाकीच्या भीषण धडकेत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
हॉटेल ऋषीकेशसमोर झालेल्या या अपघातात हरेष किरकिरे यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात दुचाकीवरील पुष्पराज झुंझुटे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर पिकअप वाहन रस्त्यावर उलटले.
घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मृत हरेष किरकिरे यांच्या पश्चात आठ महिन्यांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.
तरुणाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या अपघाताची पुढील माहिती आणि घटनेचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.