टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांना भाषा शिकण्यासाठी ३० दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रशिक्षणानंतर चालकांना मराठी अवगत करण्यासाठी ९० दिवसांची मुदत देण्यात येणार असल्याची माहिती आहे. निर्धारित कालावधीत मराठी भाषा आत्मसात न केल्यास संबंधित बॅचवर निलंबनाची कारवाई होऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे.
या नियमामुळे टॅक्सी चालक आणि प्रवाशांमधील संवाद अधिक सुलभ होण्यास मदत होणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या नियमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होणार, प्रशिक्षण कोण देणार आणि चालकांची भाषा क्षमता कशी तपासली जाणार, हेही महत्त्वाचे प्रश्न आहेत.
प्रशिक्षणाचा कालावधी, त्यातील अभ्यासक्रम, परीक्षा किंवा मूल्यमापनाची पद्धत आणि नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांवर होणारी कारवाई याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘आपलं नाशिक’ने परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे.


