त्र्यंबक दर्शनासाठी जात असताना ठक्कर बाजार बसस्थानकात रविवारी रात्री दुर्दैवी अपघात झाला. १८ वर्षीय आकांक्षा शेलार हिचा बसखाली चिरडून मृत्यू झाला.
प्रवाशांच्या प्रचंड रेटारेटीमुळे तरुणीचा तोल गेल्याची माहिती समोर आली आहे. चालत्या एसटीच्या चाकाखाली आल्याने ही दुर्घटना घडली.
श्रावणी सोमवारमुळे बसस्थानकात भाविकांची अलोट गर्दी होती. या गर्दीत घडलेल्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
डोळ्यांदेखत लेक गमावल्याने शेलार कुटुंबाचा आक्रोश झाला. या दुर्दैवी घटनेनंतर बसस्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
बसस्थानकावर पुरेशी सुरक्षा नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. एसटी प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


