नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी कुंभमेळ्याच्या कामांबाबत नाशिककरांना थेट चॅलेंज दिलं होतं. “कामांमध्ये एक चूक दाखवा, मी माझं नाव बदलेन,” असं आव्हान करण्यात आलं होतं.

मात्र आता याच चॅलेंजवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण महापौर बंगल्यासमोर नुकताच तयार करण्यात आलेला रस्ता गॅस पाइपलाइनच्या कामासाठी पुन्हा खोदण्यात आला आहे.

मग रस्ता तयार करण्यापूर्वी संबंधित कामांचं नियोजन का झालं नाही? विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव होता का? आणि नव्याने तयार केलेला रस्ता पुन्हा खोदण्याची वेळ नेमकी का आली?

आयुक्तांचं चॅलेंज आणि महापौर बंगल्यासमोरच उभे राहिलेले हे प्रश्न… यावर आता आयुक्त काय उत्तर देणार? नाशिककरांचं लक्ष आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लागलं आहे.

या संपूर्ण प्रकरणाची पाहणी केली ‘आपलं नाशिक’चे प्रतिनिधी विठ्ठल भाडमुखे यांनी.

आपलं नाशिक | आपला आवाज