किड्स-कट्टा हा मुलांसाठी खास मनोरंजन, मस्ती, कला आणि ज्ञानाचा भन्नाट कार्यक्रम आहे. मुलांच्या निरागस विश्वाला व्यासपीठ देणाऱ्या या कार्यक्रमातून चिमुकल्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्रत्येक मुलामध्ये काही ना काही खास कला आणि प्रतिभा दडलेली असते. Drawing, Singing, Dance, Craft, Talent, Fun Activities तसेच विविध खेळ आणि गप्पांच्या माध्यमातून मुलांना व्यक्त होण्याची संधी किड्स-कट्टामधून मिळणार आहे.
मुलांसाठी केवळ मनोरंजनच नाही, तर खेळता-खेळता नवीन गोष्टी शिकण्याची आणि आपली कला इतरांसमोर सादर करण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे. चिमुकल्यांचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणे आणि त्यांच्यातील कलाकाराला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
किड्स-कट्टामध्ये मुलांची धमाल, त्यांच्या भन्नाट कल्पना, कलागुण, मजेदार किस्से आणि विविध मनोरंजक उपक्रम पाहायला मिळणार आहेत.


