नाशिक : गणेशोत्सव अगदी जवळ आला असून शहर आणि जिल्ह्यातील गणेश मंडळांकडून उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात मंडळांना विविध शासकीय विभागांकडून परवानग्या घेणे, मिरवणूक मार्ग निश्चित करणे, वीज व्यवस्था तसेच इतर प्रशासकीय प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो.
प्रत्येक गणेश मंडळाला स्वतंत्रपणे या प्रक्रियेत धावपळ करावी लागू नये आणि मंडळांच्या विविध अडचणी व प्रश्नांसाठी एकत्रित व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नाशिक जिल्हा आणि शहर गणेशोत्सव महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
या महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांच्याशी ‘आपलं नाशिक’ने विशेष संवाद साधला. यावेळी गणेश मंडळांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, शासकीय परवानग्या, मिरवणूक मार्ग, वीज व्यवस्था आणि प्रशासनासोबत समन्वय साधण्याबाबत चर्चा करण्यात आली.
गणेश मंडळांच्या प्रश्नांसाठी एकत्रितपणे पाठपुरावा करण्याची गरज का निर्माण झाली? नव्या महामंडळाची नेमकी भूमिका काय असणार? मंडळांना परवानग्या मिळवताना येणाऱ्या अडचणी कशा सोडवल्या जाणार? तसेच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाचे नियोजन काय आहे?
या सर्व प्रश्नांवर समीर शेटे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
नाशिक शहर आणि जिल्ह्यातील गणेश मंडळांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या नव्या महामंडळाची भूमिका आणि आगामी नियोजन जाणून घेण्यासाठी पाहा **‘आपलं नाशिक’**चा हा विशेष संवाद.
आपलं नाशिक | आपला आवाज


