राज्यातील सरकारी यंत्रणेत लाचखोरीचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ACBच्या आकडेवारीनुसार, गेल्या साडेसात महिन्यांत राज्यात लाचखोरीचे तब्बल ४८० सापळे रचण्यात आले असून, यामध्ये ७४५ संशयित जाळ्यात अडकले आहेत.

या आकडेवारीत नाशिक विभाग १०३ गुन्ह्यांसह आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पुणे विभागात ८९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये महसूल आणि पोलीस विभागातील प्रकरणे सर्वाधिक असल्याचे ACBच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. सरकारी यंत्रणेतील वर्ग ३ चे कर्मचारीही अशा प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे दिसून आले आहे.

लाचखोरांना रंगेहाथ पकडण्यासाठी ACBकडून सातत्याने सापळे रचले जात असले तरी, कारवाईनंतरच्या तपासाची स्थितीही चिंताजनक आहे.

आकडेवारीनुसार, तब्बल ८६ टक्के लाचखोरीचे गुन्हे तपासावर प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन आणि डिजिटल कारभाराचा विस्तार होत असतानाही सरकारी यंत्रणेत लाचखोरीची प्रकरणे समोर येत असल्याने भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे मोठे आव्हान ACBसमोर आहे.

नाशिक आणि पुणे विभागातील लाचखोरीच्या आकडेवारीकडे विशेष लक्ष वेधले जात असून, कोणते विभाग आणि कोणत्या शासकीय यंत्रणांमध्ये सर्वाधिक प्रकरणे आहेत, हा प्रश्नही चर्चेत आला आहे.

नाशिक विभागातील १०३ गुन्ह्यांसह राज्यातील लाचखोरीची संपूर्ण आकडेवारी काय सांगते? जाणून घ्या Apla Nashikच्या या विशेष रिपोर्टमध्ये.