नाशिकमध्ये फरार आरोपींविरोधात पोलिसांची विशेष मोहीम सुरू असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने नऊ वर्षांपासून फरार असलेल्या संभाजी उर्फ संभ्या विलास कवळेला ताब्यात घेतले आहे.
श्रमिकनगर, सातपूर परिसरातून पोलिसांनी ही कारवाई केली. कवळे हा जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार होता.
या प्रकरणात कवळेविरोधात सीआरपीसी कलम २९९ अन्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना कवळे श्रमिकनगर परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर पुढील कारवाईसाठी कवळेला सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी १८ जूनपासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान आतापर्यंत १३ फरार आरोपींचा शोध घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून ही मोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे.


