नाशिकरोडच्या गोसावीवाडीत रविवारी झालेल्या सुमित पगारे हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पूर्ववैमनस्य आणि वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
‘आपल्यातील वाद मिटवू’ असा बहाणा करत सुमित पगारे यांच्याशी हात मिळवण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर नाशिकरोड पोलिस, क्राईम युनिट आणि गुंडा विरोधी पथकाने संयुक्त तपास सुरू केला.
या संयुक्त कारवाईत अवघ्या २४ तासांत १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहेत.
या प्रकरणातील मुख्य शूटर राजिक शेख याच्यासह आणखी एका संशयिताचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, कारवाईदरम्यान पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
हत्येमागील नेमका कट, गोळीबाराची पार्श्वभूमी आणि इतर संशयितांची भूमिका तपासण्यासाठी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
कायद्याचा बालेकिल्ला
ब्रेकिंग
सुमित पगारे हत्या प्रकरणाचा २४ तासांत उलगडा; १२ संशयित ताब्यात
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
कायद्याचा बालेकिल्ला
हत्या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा द्या; जयनाथ पूर्णेकर यांचा महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा
कायद्याचा बालेकिल्ला
भिवंडीत गुंगीकारक औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश
कायद्याचा बालेकिल्ला
सावतानगरमध्ये गरबा पाहायला गेलेल्या युवकावर धारदार शस्त्राने हल्ला; सागर एखंडे जखमी
कायद्याचा बालेकिल्ला
नाशिकच्या रामकुंड परिसरातील ध्वजस्तंभांवरील पितळी वस्तूंची चोरी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कायद्याचा बालेकिल्ला
नोकरीच्या आमिषाने ऑनलाइन फसवणूक! ३८ सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी असलेला संशयित अटकेत


