बागलाण तालुक्यातील आराईच्या रूमणे शिवारात गेल्या काही दिवसांपासून तीन बिबट्यांचा वावर असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वारंवार बिबट्यांचा वावर आढळून आल्याने नागरिकांनी वनविभागाकडे तक्रारी करून परिसरात आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
नागरिकांच्या तक्रारीनंतर वनविभागाने रूमणे शिवारात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर मध्यरात्री एका बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
मात्र परिसरात आणखी दोन बिबटे असल्याची माहिती असल्याने नागरिकांची चिंता अद्याप कायम आहे. शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाकडून उर्वरित बिबट्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
बिबट्यांचा वावर असलेल्या परिसरात नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच रात्रीच्या वेळी अनावश्यकपणे बाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे.
रूमणे शिवारातील बिबट्यांचा वावर, एका बिबट्याचे जेरबंदीकरण आणि उर्वरित दोन बिबट्यांचा सुरू असलेला शोध याबाबतचा सविस्तर अपडेट पाहा आपलं नाशिक | आपला आवाज वर.


