नाशिकच्या पंचवटी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याच्या दरात घट झाली आहे. मेथी, कोथिंबीर, शेपू यांसह विविध पालेभाज्या स्वस्त झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या भाजीपाल्याच्या दरामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत होता. मात्र आता बाजारातील आवक वाढल्याने दरामध्ये घसरण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी ४० रुपयांना मिळणारी मेथी आता २० रुपयांना उपलब्ध होत आहे. यासोबतच कोथिंबीर, शेपू आणि इतर पालेभाज्यांचे दरही कमी झाले आहेत.

दर कमी झाल्यामुळे बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढताना दिसत आहे. स्वस्त दरात भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

मात्र दुसरीकडे कमी दरात भाजीपाला विकावा लागत असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

ग्राहकांना स्वस्त भाजीपाल्याचा फायदा होत असला, तरी व्यापाऱ्यांच्या अडचणीही कायम असल्याचे चित्र पंचवटी बाजार समितीत पाहायला मिळत आहे.