महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. कळंब तालुक्यातील नरसापूर येथे ते शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची पाहणी करणार आहेत. अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे या दौऱ्यात प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

दरम्यान, बावनकुळे यांच्या यवतमाळ दौऱ्यावर माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांनी टीका केली आहे. केवळ पीक नुकसानीची पाहणी न करता शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे गरजेचे असल्याचे पुरके यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचे पैसे तातडीने जमा करण्यात यावेत, अशी मागणी वसंतराव पुरके यांनी केली आहे. पीक नुकसानीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

बावनकुळे यांच्या दौऱ्यात पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शासनाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.