संजय राऊतांचा संजय जाधवांवर बोचरा हल्लाबोल; “जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे?”

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संजय जाधव यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार?” असा सवाल करत राऊतांनी जाधवांवर बोचरी टीका केली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आरक्षणाचा प्रश्न सरकारने गांभीर्याने घ्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी या विषयासाठी वेळ द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच भाजपने जातीय राजकारण थांबवावं, असा सल्लाही राऊतांनी दिला.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सरकारकडून वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत, जरांगेंना गुंडाळण्यासाठी बैठका सुरू असल्याचा आरोपही राऊतांनी केला. त्यामुळे राऊतांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.