नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कावनाई तीर्थक्षेत्र येथे कपिलधारा तीर्थ, स्वर्गाश्रम आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मूळ स्थानाच्या विकासासाठी भूमिपूजन तसेच श्री गोदावरी गंगा तीर्थपूजन सोहळा उत्साहात पार पडला.
वैदिक मंत्रोच्चारात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री छगन भुजबळ, महंत श्री राम नारायण दाजी महाराज, जगद्गुरू श्री कल्कीराम महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. धार्मिक परंपरा आणि विधीवत पूजनानंतर विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी कावनाई तीर्थक्षेत्राच्या धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने नियोजित कामांचा आढावा देखील सादर करण्यात आला.
कार्यक्रमानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी विकासकामांबाबत आपली भूमिका मांडली. या उपक्रमांमुळे कावनाई तीर्थक्षेत्राची धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या ओळख अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


