नाशिक : आगामी नवरात्रोत्सवाचा उत्साह शहरभरात पाहायला मिळत असून, घटस्थापनेला अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने मूर्तिकारांची लगबग कमालीची वाढली आहे. शहरातील विविध कारखान्यांमध्ये देवीच्या मूर्तींना अंतिम रूप देण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मूर्तींचे देखणे रूप खुलवण्यासाठी रंगकाम, डोळे आखणी, दागिन्यांची सजावट आणि शेवटचा हात फिरवण्याच्या कामात मूर्तिकार रात्रंदिवस मग्न आहेत. आकर्षक रंगांची उधळण करत देवीच्या शांत व तेजस्वी रूपाला अंतिम स्पर्श दिला जात आहे. यंदा पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या मूर्तींना भाविकांकडून मोठी पसंती मिळताना दिसत आहे.
सार्वजनिक मंडळे तसेच घरगुती स्थापनेसाठी नोंदवलेल्या मूर्ती वेळेत सुपूर्द करण्यासाठी कलाकारांचे हात उशिरापर्यंत चालत आहेत. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कार्यशाळांमधील ही धावपळ आणि भक्तीमय वातावरण पाहण्यासारखे आहे. अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या या उत्सवासाठी आता केवळ मूर्ती मंडपात विराजमान होण्याची प्रतीक्षा उरली आहे
नाशिक शहर
ब्रेकिंग
घटस्थापनेनिमित्त उत्साह शिगेला, मूर्तिकारांनी लगबग वाढली
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
नाशिक शहर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दोन मोठ्या घोषणा; शेतकरी कन्यांचे विवाह अन् कुंभमेळ्यातील १३ आखाड्यांचे भोजन शिवसेना करणार!
नाशिक शहर
नाशिकमध्ये २ हजार ६३३ निरक्षरांची साक्षरता चाचणी; २२१ परीक्षा केंद्रांवर आयोजन
नाशिक शहर
आरंभ कॉलेजजवळ महिलेची पर्स चोरीला; सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला दिशा
नाशिक शहर
नाशिकमध्ये ५०१ जणांच्या शंखनादानंतर गोदावरीची भव्य आरती
नाशिक शहर
उघड्यावर मद्यपान आणि टवाळखोरीविरोधात अंबड पोलिसांची धडक कारवाई


