श्रावण महिना सुरू होताच नाशिकच्या फुल बाजारात फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

झेंडू आणि शेवंतीच्या दरवाढीमुळे श्रावणातील पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी फुले खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे.

झेंडूचा २०० रुपये कॅरेट असलेला दर आता ४०० रुपयांवर पोहोचला आहे.

तर १०० रुपये किलो असलेला झेंडू आता १६० रुपये किलोवर विकला जात आहे.

शेवंतीच्या दरातही सुमारे ४० रुपयांची वाढ झाल्याची माहिती फुल बाजारातून समोर आली आहे.

दरवाढीचा थेट परिणाम ग्राहकांच्या खरेदीवर झाला असून, फुल बाजारातील गर्दी कमी झाल्याचे दिसत आहे.

ग्राहकांची संख्या कमी झाल्याने फुल विक्रेत्यांच्या विक्रीवरही परिणाम होत आहे.

श्रावणात फुलांची मागणी वाढलेली असताना दरवाढीमुळे ग्राहक आणि विक्रेते दोघांनाही फटका बसत आहे.