नाशिकच्या त्रिमूर्ती चौकातील श्री दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळेनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली असून, यामुळे परिसराला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले आहे.

दरम्यान, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मंदिर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा दिवाळी पाडव्याच्या पहाटे आयोजित करण्यात येणारा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

उत्सवाच्या आनंदासोबतच संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला प्राधान्य देण्याच्या भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाच्या या निर्णयाची सध्या चर्चा होत आहे.