नाशिक : दिल्लीतील आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले.
नाशिकच्या रामकुंड परिसरात कार्यकर्त्यांनी सोनम वांगचुक यांचा फोटो लावून केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
दिल्लीतील घटनेचे पडसाद नाशिकमध्ये उमटले असून, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवरील कारवाईचा निषेध आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


