सातारा : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत महायुती आणि मित्रपक्षांमधील समेटानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. जिल्हा परिषदेच्या ९ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित जागांवरही महायुतीचा विजय होईल, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

महायुती एकसंघपणे निवडणूक लढवणार असल्याचं सांगत उदयनराजेंनी आघाडीच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला. काही ठिकाणी चुरशीची लढत असली, तरी महायुतीच्या एकजुटीचा फायदा होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.