नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अखिल भारतीय संत समितीची महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे.

देशभरातून संत-महंत, महामंडलेश्वर आणि धर्माचार्य या बैठकीसाठी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.

गंगापूर रोडवरील नेपाल हॉलमध्ये दीपप्रज्वलनाने बैठकीच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कुंभमेळ्याच्या नियोजनासह विविध धार्मिक आणि सामाजिक विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संत समितीच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या बैठकीत देशभरातून आलेले संत-महंत सहभागी झाले आहेत.

यावेळी नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांचीही उपस्थिती आहे.

कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत बैठकीत कोणते निर्णय आणि सूचना पुढे येतात, याकडे लक्ष लागले आ