आजच्या 'आपला योग' या विशेष भागात आपण जाणून घेणार आहोत, शांत आणि गाढ झोप लागण्यासाठी कोणता योगाभ्यास करावा? धावपळीची जीवनशैली, ताणतणाव, मोबाईलचा वाढता वापर आणि अनियमित दिनचर्येमुळे अनेकांना निद्रानाश आणि अपुरी झोपेची समस्या भेडसावत आहे. अशावेळी काही सोपे योगासन, प्राणायाम आणि ध्यान पद्धती मन शांत करून चांगली झोप मिळविण्यास मदत करू शकतात. या भागात जाणून घ्या, झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणते योगाभ्यास फायदेशीर ठरतात, तणाव कसा कमी होतो आणि निरोगी जीवनासाठी पुरेशी झोप का महत्त्वाची आहे. निरोगी आणि तंदुरुस्त जीवनासाठी पाहत राहा 'आपला योग', फक्त आपलं नाशिक – आपला आवाज वर.