निफाड तालुक्यातील देवगाव येथे पीकविम्याची नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांनी सरण रचून अनोखे आंदोलन केले. अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांना न्याय मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. विमा कंपनीविरोधात घोषणाबाजी करत सरसकट पीकविमा मंजूर करून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली.