नाशिक : राज्यात पुढील दोन महिन्यांत कांद्याची टंचाई निर्माण होणार असल्याच्या चर्चांना शेतकरी नेते भारत दिघोळे यांनी फेटाळून लावले आहे. सध्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात कांदा उपलब्ध असून नवीन हंगामातील कांद्याची लागवडही मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कांद्याचा पुरवठा सुरळीत राहणार असून, बाजारात चुकीची माहिती पसरवून हस्तक्षेप करू नये, अशी मागणी भारत दिघोळे यांनी केली आहे.
कांद्याचे दर कृत्रिमरीत्या पाडण्याचा प्रयत्न झाल्यास शेतकरी आंदोलनाची भूमिका घेतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या हिताला धक्का सहन केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कांद्याच्या बाजारभावावर लक्ष ठेवून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.


