अनकाई किल्ल्यावर दर्शनासाठी आलेल्या अमित धुळगंड या भाविकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अमित धुळगंड हे संगमनेरहून दर्शनासाठी अनकाई किल्ल्यावर आले होते.
किल्ल्यावर असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना डोंगरावरून खाली आणण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र याचदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि स्थानिक युवकांनी मदतीसाठी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली आणण्यात आला.
या घटनेमुळे अनकाई किल्ला परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अमित धुळगंड यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


