एसआयआर मोहिमेत अपेक्षित कमिटेड मतदारांचे अर्ज कमी भरल्याने भाजपची चिंता वाढल्याचे चित्र आहे.
याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील पदाधिकाऱ्यांची एसआयआरबाबत बैठक पार पडली.
पंचवटीतील स्वामीनारायण सभागृहात झालेल्या बैठकीत मतदार पुनर्निरीक्षण मोहिमेचा आढावा घेण्यात आला.
काही मतदारसंघांमध्ये अपेक्षित काम झाले नसल्याबद्दल बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.
संपर्काबाहेर असलेल्या मतदारांचा बूथनिहाय शोध घेऊन त्यांचे अर्ज भरून घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
मतदारयादीतील त्रुटी दूर करणे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यावरही भर देण्यात आला.
एसआयआरच्या दुसऱ्या टप्प्यात बूथ पातळीवरील काम अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मतदारयादीच्या कामाला अधिक वेग दिल्याचे या बैठकीतून दिसून आले.
ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग
कमिटेड मतदारांच्या कमी अर्जांमुळे भाजपचे टेन्शन वाढले; एसआयआर बैठकीत पदाधिकाऱ्यांची कानउघडणी
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#BJP
संबंधित बातम्या
ब्रेकिंग न्यूज
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे आंदोलन; सेंट्रल किचन योजना रद्द करण्याची मागणी
ब्रेकिंग न्यूज
नाशिक रोड प्रभाग समितीत गदारोळ; पाणीटंचाई आणि फेरीवाल्यांच्या वसुलीवरून वाद
ब्रेकिंग न्यूज
त्र्यंबकच्या हेलिपोर्टच्या जागेवरून वाद; जमीन प्रकरण उच्च न्यायालयात
ब्रेकिंग न्यूज
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत एकनाथ शिंदे सक्रिय; नाशिक दौऱ्यात विकासकामांचा आढावा | Eknath Shinde
ब्रेकिंग न्यूज
सिंहस्थ कुंभमेळ्यात शैव-वैष्णव आखाड्यांचे मनोमिलन होणार; गिरीश महाजनांची माहिती


