डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. डॉ. निलेश जेजुरकर आणि डॉ. स्वाती चव्हाण यांच्यावर आरोग्य विभागाकडून निलंबनाची कारवाई सुरू झाल्याची माहिती आहे.
दोघेही मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. न्यायालयीन कोठडीत ४८ तासांपेक्षा जास्त काळ राहिल्याने निलंबनाची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, नाशिक सत्र न्यायालयाने डॉ. निलेश जेजुरकर आणि डॉ. स्वाती चव्हाण यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
आरोपी डॉक्टरांवरील निलंबनाची कारवाई अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात पुढील काळात आरोग्य विभाग आणि न्यायालयाकडून कोणते निर्णय घेतले जातात, याकडे लक्ष लागले आहे.


