नाशिकच्या पंचवटी परिसरात गोदावरी नदीपात्राच्या स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. संत गाडगे महाराज पुलाखाली साचलेले दूषित पाणी थेट गोदावरी नदीपात्रात मिसळत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरत आहे. आठवडे बाजारातील विक्रेत्यांनाही या दूषित पाण्याचा त्रास होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
ड्रेनेजची समस्या तातडीने दूर करून नदीपात्रात दूषित पाणी जाणार नाही, यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


