नाशिक जिल्ह्यातील ओझर उड्डाणपुलावर शिरपूर-नाशिक बसचा अपघात झाला. या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. सुदैवाने जीवितहानी टळल्याची माहिती आहे. अपघातानंतर ओझर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.