नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.
भाजपच्या काही महिला नगरसेविकांची पंचवटीतील एका नगरसेविकेच्या घरी बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.
किटी पार्टी किंवा चहापानाच्या निमित्ताने झालेल्या या बैठकीत महापौर हटावचा मुद्दा चर्चेत आल्याचं सांगितलं जात आहे.
मुख्यमंत्र्यांकडे वेळ घेऊन या विषयावर चर्चा करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
या बैठकीला महायुतीतील काही नगरसेविका उपस्थित असल्याचंही सांगितलं जात आहे.
दरम्यान, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन शहानिशा करण्याचं स्पष्ट केलं आहे.
बैठकीत पक्षशिस्तीचा भंग झाल्याचं आढळल्यास कारवाई केली जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
खड्ड्यांच्या प्रश्नासोबतच महापौर हटावच्या चर्चेने नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग
खड्ड्यांच्या मुद्द्यावरून नाशिक भाजपात महापौर हटावची चर्चा?
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#नाशिक महापौर
संबंधित बातम्या
ब्रेकिंग न्यूज
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत एकनाथ शिंदे सक्रिय; नाशिक दौऱ्यात विकासकामांचा आढावा | Eknath Shinde
ब्रेकिंग न्यूज
सिंहस्थ कुंभमेळ्यात शैव-वैष्णव आखाड्यांचे मनोमिलन होणार; गिरीश महाजनांची माहिती
ब्रेकिंग न्यूज
महसूल अधिकाऱ्यांचे दालन रोज दोन तास जनतेसाठी खुले; दुपारी ३ ते ५ जनता दरबार
ब्रेकिंग न्यूज
अमृत मिरवणूक मार्गावरील भूमिगत कामांना आठ दिवसांची मुदत; मुदतीनंतर रस्ते खोदाई बंद
ब्रेकिंग न्यूज
आडगावच्या टेकड्या मुरूम माफियांच्या घशात! | Apla Nashik


