नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसवर इगतपुरीजवळ दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास इगतपुरी-कसारा घाट परिसरात ही घटना घडली.
दगडफेकीत ट्रेनच्या ए-वन कोचमधील खिडकीची काच फुटली.
घटनेनंतर आरपीएफने तातडीने शोधमोहीम राबवली.
या कारवाईत संजय तातू सोनवणे या ४३ वर्षीय संशयिताला ताब्यात घेण्यात आले.
संशयित इगतपुरीतील चिमणवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
संशयिताने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती असून, न्यायालयाने त्याला २४ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणातील संशयितावर यापूर्वीही रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.