पावसाळ्यात वातावरणातील बदलांचा थेट परिणाम पचनशक्ती आणि आरोग्यावर होत असतो. त्यामुळे ऋतूनुसार आहारात योग्य बदल करणे आवश्यक असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे. विशेषतः आषाढी एकादशीनंतर सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात संतुलित आणि सहज पचणारा आहार घेण्यावर भर दिला जातो.
या विशेष भागात ऋतूनुसार आहार का बदलावा, पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे. तसेच पावसाळ्यात पचनशक्ती कमी होत असल्याने ताजे, गरम आणि हलके अन्न सेवन करण्याचे महत्त्वही समजावून सांगितले जाईल.
याशिवाय श्रावण महिन्यातील पारंपरिक आहारपद्धती, उपवासाच्या काळात योग्य खाद्यपदार्थांची निवड आणि आयुर्वेदानुसार दैनंदिन जीवनशैलीत कोणते बदल करावेत, याबाबतही मार्गदर्शन करण्यात येईल.
पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांपासून बचाव, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आणि निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदातील उपयुक्त टिप्स या विशेष भागातून जाणून घेता येतील.


